शिक्षकाचे विद्यार्थिनींशी अश्लील चाळे

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : शाळेतील वर्गातच पाच अल्पवयीन विद्यार्थिनींशी शिक्षकाने अश्लील वर्तन करून विनयभंग केल्याची खळबळजनक घटना चिकलठाणा भागात उघडकीस आली आहे. खाजी मुजिबोद्दीन नसिरोद्दीन (४०, रा. नॅशनल कॉलनी, हर्सूल) असे आरोपीचे नाव असून त्याला अटक करण्यात असल्याची माहिती पोलिस निरीक्षक गीता बागवडे यांनी दिली. आरोपी खाजी मुजिबोद्दीन याने २०२४ पासून ते ७ जानेवारी २०२६ या कालावधीत सहावी आणि सातवीमध्ये शिकणार्‍या १४ ते १५ वयोगटातील पाच विद्यार्थिनींशी शाळेच्या वर्गातच गैरवर्तन केले. आरोपी शिक्षक हा वर्गात मोजक्याच पाच मुलींना जबरदस्तीने उभा करायचा. गुटखा खाऊन त्यांच्या अंगाला अश्लील स्पर्श करायचा. तसेच मारहाण करायचा, असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. मुलींना धाक दाखवून तो गैरवर्तन वारंवार करत होता. हा प्रकार मुलींनी पालकांना सांगितल्यानंतर शाळेने आरोपीला नोटीस बजावताच तो गायब झाला. त्यामुळे मुख्याध्यापिकेने मंगळवारी रात्री एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी खाजी मुजिबोद्दीन याच्याविरुद्ध बीएनएस कलम ७४, ७५, ११५ (२), ३५१ (२) सह पोक्सो अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.